E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जुन्या वादातून चालकाने पेटवली बस
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
दिवाळीचा कापलेला पगार आणि कर्मचार्यांसोबतच्या वादातून कृत्य
पिंपरी
: हिंजवडीतील बस दुर्घटनेस धक्कादायक वळण लागले आहे. दिवाळीचा कापलेला पगार आणि कर्मचार्यांसोबतच्या वादातून चालकाने केमिकल पेटवून बसला आग लावल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चालकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.जनार्दन हंबर्डीकर (वय ५६, रा. कोथरूड) असे या चालकाचे नाव आहे. या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंजवडीतील व्योम ग्राफिक कंपनीच्या बसवर तो चालक म्हणून काम करतो. हंबर्डीकर याचे काही कर्मचार्यांशी वाद होते. तसेच दिवाळीत कंपनीने त्याचा पगारही कापला होता. त्याला अतिरिक्त कामे व अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्याचा सहकार्यावर रोष होता. या रागातून त्याने घातपात घडविला. त्याने घटनेच्या एक दिवस आधी मंगळवारी कंपनीतूनच एक लीटर बेंजिम सोल्युशन नावाचे रसायन बाटलीत भरून सीटखाली आणून ठेवले. टोनर पुसण्यासाठी लागणार्या चिंध्याही त्याने ठेवल्या. बुधवारी सकाळी त्याने वारजे माळवाडी येथून आगपेटी विकत घेतली. हिंजवडी टप्पा एक परिसरात येताच हंबर्डीकरने बस थांबवत काडी पेटवून कापडाच्या चिंध्यांना आग लावली. रसायनामुळे काही वेळातच आगीचा भडका उडाला. त्यानंतर, त्याने तातडीने बसमधून बाहेर उडी मारली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, चालकासह सहा कामगार जखमी झाले. त्यापैकी, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
असा आला प्रकार उघडकीस
बसची तपासणी केल्यानंतर काडीपेटीसह काही वस्तू आढळल्या. प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या अधिकार्यांनी बसची पाहणी केली असता शॉर्टसर्कीटची पुष्टी झाली नाही. एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये हंबर्डीकर बसच्या सीट खाली काहीतरी पेटवत असल्याचे पुसटसे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. शिवाय, जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यात तफावत दिसत होती. किरकोळ जखमी होऊनही तो वारंवार शुद्ध हरपल्याचे नाटक करत होता, हे पोलिसांच्या लक्षात आले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दिवाळीचा कापलेला पगार, मजुरीचे काम आणि कर्मचार्यांसोबतच्या वादातून चालकाने रसायन पेटवून आग लावल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हंबर्डीकर वैद्यकीय कोठडीत आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त
Related
Articles
जनसंवाद सभेमुळे नागरिक व प्रशासनातील संवाद वाढेल
26 Mar 2025
जल सुरक्षा सुनिश्चित करण्यात हायड्रॉलिक संरचना महत्त्वाची : वर्मा
28 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
28 Mar 2025
कुणाल कामरा याला पुन्हा समन्स
27 Mar 2025
टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
युपीआय व्यवहारावर कर?
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
दुधाची दरवाढ (अग्रलेख)
5
’वैशाली’च्या मालकाच्या जावयास अटक
6
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)